Sunday

03-08-2025 Vol 19

एम. डी. पाखरे यांचा सेवाभाव

आळंदी वार्ता: आळंदीतील ज्येष्ठ पत्रकार आणि रिक्षाचालक एम. डी. पाखरे यांची सेवाभावी वृत्ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. आज सकाळी त्यांची भेट एका वयोवृद्ध बाबांशी झाली. बाबांनी पाखरे यांना भोसरीला सोडण्याची विनंती केली, परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. पाखरे यांनी कोणताही विचार न करता, “चालेल बाबा, बसा,” असे म्हणत त्यांना भोसरी येथे एक रुपयाही न घेता सुरक्षितपणे सोडले.

पाखरे हे केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. रिक्षा चालवताना ते अंध आणि अपंग व्यक्तींसाठी मोफत प्रवासाची सुविधा देतात. तसेच विद्यार्थ्यांना अर्ध्या शुल्कत प्रवास देतात. याशिवाय, आळंदीला येणाऱ्या भाविकांसाठी ते अवघ्या २५१ रुपयांत संपूर्ण आळंदी दर्शन घडवतात. यामध्ये सिद्धबेट, विश्रांतीवड, संतोषी माता, पद्मावती आदी प्रमुख स्थळांचा समावेश आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे भाविकांना आळंदी दर्शनाचा आनंद कमी खर्चात घेता येतो.

पाखरे यांच्या या निःस्वार्थ सेवेचे आळंदी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपत ते पत्रकारिता आणि रिक्षा चालवण्याचे काम एकाच वेळी यशस्वीपणे करतात. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी त्यांच्या या कार्याला सलाम करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

alandivarta