Sunday

03-08-2025 Vol 19

श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा बारावीत दमदार निकाल: कला शाखेत ९६%, वाणिज्य शाखेत ९८% यश; सानिका, नेहा अव्वल

आळंदी वार्ता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत घेतलेल्या बारावी (एच.एस.सी.) परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. यात श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने उत्कृष्ट कामगिरी करत कला शाखेत ९० पैकी ८६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६% आणि वाणिज्य शाखेत ८७ पैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९८% निकालाची नोंद केली.

कला शाखेचे यशस्वी विद्यार्थी –

कला शाखेत कु. सानिका देविदास पवळे हिने ८५.५०% गुण मिळवून प्रथम, संस्कार शिवाजी खाते याने ८४.३३% गुणांसह द्वितीय आणि पुरुषोत्तम तुकाराम श्रिमंगले याने ८०.८३% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

वाणिज्य शाखेचे अव्वल विद्यार्थी –

वाणिज्य शाखेत कु. नेहा हनुमान अवचार हिने ८६.३३% गुणांसह प्रथम, कु. अंकिता अर्जुन पवार हिने ८५.५०% गुणांसह द्वितीय आणि कु. वैष्णवी मोतीराम गडदे हिने ८१.६७% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

संस्थेकडून अभिनंदन –

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. सर्वांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री ज्ञानेश्वर विद्यालयाने आपली यशस्वी परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया घातला आहे. या यशाने संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

alandivarta