आळंदी वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाने ९९.५२% निकालासह दमदार यश संपादन केले. विद्यालयातील ४१४ पैकी ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दिव्यांग विभागाने १००% निकालाची परंपरा कायम ठेवत अभिमानास्पद कामगिरी नोंदवली. विशेष म्हणजे, प्रथम तीन आणि ९०% हून अधिक गुण मिळवणारे सर्व विद्यार्थी विद्यालयाच्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमाचे सहभागी आहेत.
विद्यालयात भक्ती रविकांत राऊत हिने ९७.००% गुण मिळवत प्रथम, सुजित विठ्ठल जोरी आणि प्रणव निळोबाराय शिंदे यांनी ९६.२०% गुणांसह द्वितीय, तर सायली अमोल पराये हिने ९५.६०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय आदित्य कंकाळे (९५.००%), गायत्री जाधव (९४.८०%), वैष्णवी पाखरे (९४.२०%), प्रणम्य पालकर (९३.६०%), सलोनी घुले (९३.४०%), सिरसकर (९२.२०%), अरुंधती पांचाळ (९१.४०%), अनिकेत आयाचित (९०.६०%) आणि गौरी बोर्डे (९०.२०%) यांनी उत्कृष्ट गुण मिळवले.
दिव्यांग विभागातही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. पूर्वा नाईक हिने ७९.०४% गुणांसह प्रथम, गायत्री ढेपे हिने ७६.४०% गुणांसह द्वितीय, तर हर्षदा लोखंडे हिने ७५.४०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाने कौतुक केले.
विद्यालयाच्या यशाचे श्रेय समन्वयिका सायुज्यता तायडे, दहावीचे वर्गशिक्षक, मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांना देण्यात आले. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी टॉपर्स –
प्रथम: भक्ती रविकांत राऊत – ९७.००%
द्वितीय: सुजित विठ्ठल जोरी, प्रणव निळोबाराय शिंदे – ९६.२०%
तृतीय: सायली अमोल पराये – ९५.६०%
दिव्यांग विभाग: पूर्वा नाईक (७९.०४%), गायत्री ढेपे (७६.४०%), हर्षदा लोखंडे (७५.४०%)
‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमाचा प्रभाव –
‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमात सहभागी सर्व टॉपर्सनी ९०% हून अधिक गुण मिळवत विद्यालयाचा मान वाढवला. “हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरला आहे. यामुळे मेहनतीला दिशा मिळाली,” असे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले.