Sunday

03-08-2025 Vol 19

प्रकाशदादा वाडेकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी फेरनिवड

राजगुरूनगर: शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाशदादा सोपान वाडेकर यांची शिवसेनेच्या पुणे उपजिल्हाप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली. ही घोषणा शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. याप्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे आणि राम रेपाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख इरफान सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना खेड तालुकाप्रमुख निलेश पवार, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचे संचालक नितीन गोरे, महिला आघाडीच्या पुणे जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, तालुका संघटक महादेवराव लिंभोरे पाटील, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती केशव आरगडे, युवासेना तालुकाप्रमुख विशाल पोतले, उपतालुकाप्रमुख अंबर सावंत, काळूराम खैरे, गोरक्षनाथ बच्चे, चाकण शहरप्रमुख व मा. नगरसेवक महेश शेवकरी, आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, युवासेना समन्वयक अमोल इंगळे, शिव सहकार सेनेचे तालुकाप्रमुख मारुती चिमाजी सातकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सम्राट देवकर, जिल्हा समन्वयक महेश जाधव, युवासेना शहरप्रमुख अभिजीत जाधव, संजय चौधरी पाटील, ज्ञानेश्वर घुंडरे, योगेश पगडे, किरण पडवळ, संदीप येळवंडे, राजगुरूनगर शहरप्रमुख नयना झनकर, पूजा राक्षे, मनीषा घुमटकर, यशोदा चिमटे, अमोल पडवळ, बाबू कोळपे, विशाल तापकीर, संतोष शेवाळे, शाखाप्रमुख रोहिदास कदम आणि नितीन ननवरे उपस्थित होते.

प्रकाश वाडेकर यांनी खेड तालुक्यात स्व. आमदार सुरेश गोरे यांच्यासमवेत तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या उपजिल्हाप्रमुखपदी फेरनिवडीमुळे शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले.

वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रकाशदादा वाडेकर यांचे योगदान मोलाचे ठरेल, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.

alandivarta