Sunday

03-08-2025 Vol 19

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर विद्यालयात 25 वृक्षांचे रोपण

आळंदी वार्ता: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण समिती आणि ट्रायप्रो कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 25 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाचा उल्लेख करत ट्रायप्रो कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रस्ता रुंदीकरणामुळे वृक्ष नष्ट होत असलेल्या वारीच्या मार्गावर अशा प्रकारचे वृक्षारोपण आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ट्रायप्रो कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तेजस मेमाणे यांनी कंपनीच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती देत विद्यालयास सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

या प्रसंगी प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, मुख्यालिपीका संगीता पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी योगेश कुदळे, अक्षय औटी, तेजस मेमाणे, अभिषेक मुसारकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. रसिका पांडुरंग कुर्‍हाडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

alandivarta