Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीती

आळंदी वार्ता: आळंदी ग्रामीण हद्दीत स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस आणि इंद्रायणी नदीजवळील थोरवे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. नागरिक गोविंद वैद्य, गोकुळ मुंढे, अशोक जाधव आणि उमेश गिद यांनी शनिवारी बिबट्या पाहिल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नवनाथ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्थानिकांना खबरदारी बाळगण्याचे मार्गदर्शन केले. रविवारी सकाळी पुन्हा सविस्तर पाहणी करून जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

यावेळी सचिन पाचुंदे, प्रसाद बोराटे, विशाल थोरवे, संजय चव्हाण, गोविंदा कुऱ्हाडे, समाधान पाटील, महेश कुऱ्हाडे यांच्यासह अन्य स्थानिक उपस्थित होते. वनविभागाने नागरिकांना रात्री एकट्याने फिरू नये आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याचा शोध आणि सुरक्षिततेच्या उपायांसाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

alandivarta