आळंदीत वै. जयराम बाबा भोसले यांच्या 17व्या पुण्यतिथीत हभप पांडुरंग महाराज साळुंखे यांचा सिध्दबेट वारकरी भुषण पुरस्काराने गौरव
आळंदी: वैराग्यमूर्ती वै. जयराम बाबा भोसले यांच्या 17व्या पुण्यतिथी सोहळा आळंदीत हरीनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. या सोहळ्यात विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष तसेच सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी हभप पांडुरंग महाराज साळुंखे यांना प्रतिष्ठेच्या सिध्दबेट वारकरी भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वरूपात त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि माऊलींचा प्रसाद प्रदान करण्यात आला. सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज शेवाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले, रामभाऊ चोपदार, अजित वडगावकर, सुनील रानवडे, संतोष तु.भोसले, ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, शिवाजी भोसले, आनंद जोशी, संतोष मो.भोसले यांच्यासह संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी आणि आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या दोन सत्रांतील कीर्तन सेवा.या सर्व कार्यक्रमांनी उपस्थित भक्तांना भक्तिरसात न्हाऊन टाकले.
हा सोहळा सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याला आणि वै. जयराम बाबा भोसले यांच्या स्मृतीला आदरांजली वाहणारा ठरला.