Sunday

03-08-2025 Vol 19

जून अखेरीस कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची मागणी

पुणे: सध्या सुरू असलेल्या ११ वी आणि १२ वीच्या प्रवेश प्रक्रियेनंतर (कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा) चौथ्या फेरीनंतर ऑगस्टमध्ये वर्ग सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय बदलून जून अखेरीस कनिष्ठ महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्याकडे केली.

याशिवाय, २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील शिक्षक त्वरित कमी करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी आणि पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती प्रक्रिया वर्षातून दोनदा राबवावी, अशा मागण्याही शिष्टमंडळाने मांडल्या. शिक्षण आयुक्तांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा संघांचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.

शिष्टमंडळात आप्पासाहेब बालवडकर, संग्राम कोंडे-देशमुख, शिवाजीराव चाळक, सि. टी. कुंजीर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर आणि शांताराम पोमण यांचा समावेश होता.

alandivarta