आळंदी वार्ता – येत्या 19 जूनपासून सुरू होणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी शहरात वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याच्या निर्विघ्न आयोजनासाठी पोलिस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत विशेष आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, १७ ते २० जून दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी, एकेरी मार्ग आणि काही ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांची वर्दळ लक्षात घेता, वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
जड – अवजड वाहनांस प्रवेश बंदी
१) प्रवेश बंदी मार्ग:- चाकण ते आळंदी(आळंदी फाटा चाकण) ,२) चिंबळी ते आळंदी (चिंबळी फाटा,चाकण)
पर्यायी मार्ग:- आळंदी फाटा – चिंबळी फाटा चाकण येथून – भारत माता चौक – पांजरपोळ चौक -अलंकापुरम चौक
२) पुणे विश्रांतवाडी – बोपखेल फाटा – दिघी –
मॅगझिन चौक – अलंकापुरम चौक – पांजरपोळ चौक
३)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- शेल पिंपळगाव , वडगाव घेनंद ते आळंदी( कोयाळी कमान)
पर्यायी मार्ग:- शेल पिंपळगाव – वडगांव घेनंद – कोयाळी कमान – कोयाळी – मरकळ
४)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- मरकळ ते आळंदी (धानोरी फाटा)
पर्यायी मार्ग:- मरकळ – धानोरे फाटा – च-होली फाटा – मॅगझीन चौक/ अलंकापुरम
५)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- १)भारत माता चौक ते आळंदी( भारत माता चौक ,मोशी)
पर्यायी मार्ग:- भारत माता चौक – मोशी चौक – पांजरपोळ चौक – अलंकापुरम चौक २) मोशी – चाकण – शिक्रापूर
६)वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग:- विश्रांतवाडी ते आळंदी( दिघी मॅगझीन चौक)
पर्यायी मार्ग:- १)पुणे विश्रांतवाडी – बोपखेल फाटा – दिघी –
मॅगझिन चौक – अलंकापुरम चौक – च- होली फाटा – मरकळ
आळंदी शहरात मध्यवर्ती भागात येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव च- होली फाटा चौक , डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक/बापदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड,धानोरे फाटा/पीसीएस चौक इ.ठिकाणाहून आळंदी कडे येणाऱ्या वाहनांना मनाई हवलदार वस्ती ते तळेकर पाटील चौकातून पुढे देहुफाटा येथून आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
एकेरी मार्ग
१)हवलदार वस्ती – तळेकर पाटील चौकातून उजवीकडे वळून आदित्य इंटरनॅशनल स्कूल – डुडुळगाव असा एकेरी मार्ग होणार असून डुडुळगाव चौकातून इंद्रायणी नदी पुलावरून चाकण मार्गे इच्छित स्थळी /डुडुळगाव चौकातून तळेकर पाटील चौक मार्गे हवालदार वस्ती ते मोशी चौक मार्गे इच्छित स्थळी.
२)भारतमाता चौक ते हवालदार वस्ती वाय जंक्शन ते उजवीकडे वळून मोशी हा मार्ग एकेरी करण्यात येत असून मोशी चौका कडून हवालदार वस्ती कडून भारत माता चौक येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई असणार आहे .
दि .२० रोजी पालखी मार्गावर येण्यास मनाई
विश्रांतवाडी – बोपखेल – आळंदी ,मरकळ – च -होली ते आळंदी ,मोशी चौक तसेच भारतमाता चौक ते हवालदार वस्ती मार्गे देहुफाटा आळंदी – आळंदी फाटा चाकण ते आळंदी , चिंबळी फाटा ते आळंदी , वडगाव घेनंद ते विश्रांत वड मार्गे आळंदी – पांजरपोळ चौक ते अलंकारपुरम चौक मार्गे आळंदी , मॅगझिन चौक,दिघी,बोपखेल, इ.ठिकाणी पालखी मार्गाला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांवरून येणाऱ्या ( Alandi) सर्व प्रकारांच्या वाहनांना मनाई असणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वाहनांच्या पार्किंगसाठी आळंदी परिसरात खालील ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे:
*आळंदी-देहू रोड, तळेकर पाटील चौक (दक्षिण): ३ एकर
*आळंदी-देहू रोड, तळेकर पाटील चौक (उत्तर): १ एकर
*ज्ञानविलास कॉलेज, डुडुळगाव जकात नाका: १० गुंठे
*बोपदेव चौक: ४.५ एकर
*इंद्रायणी हॉस्पिटल समोर (चाकण रोड): ९ एकर
*विश्रांतवाडी-वडगाव रोड: २५ एकर
*मुक्ताई मंगल कार्यालय समोर: १ एकर