आळंदी वार्ता: आळंदी येथील श्री राम मंदिरातील आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त न्यासाच्या विश्वस्तपदी पत्रकार अर्जुन नि. मेदनकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्वकुळ साळी समाज जातीगृह सभागृहात रविवारी (दि. 25) उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आळंदी ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी हा सत्कार उत्साहात संपन्न केला.
या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले, स्वकुळ साळी जातीगृह विश्वस्त खजिनदार मनोहर दिवाणे, उपाध्यक्ष अमित उगले, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, शिक्षण मंडळ आळंदी नगरपरिषदेचे माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, भिमाजी घुंडरे, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, रोहिदास कदम, माऊली घुंडरे, तुकाराम महाराज ताजणे, दिलीप महाराज ठाकरे, विश्वकर्मा महाराज पांचाळ, कल्याण महाराज कल्याणकर, मनसेचे तुषार नेटके, आळंदी जनहित फाउंडेशनचे रामदास दाभाडे, कृष्णाजी डहाके, दत्तात्रय डफळ, भाजपचे कार्यकर्ते मंडूबाबा पालवे, रवींद्र जोशी, चेअरमन मनोज कुऱ्हाडे, संचालक सुजित काशीद, पुरुषोत्तम बानोले, व्यवस्थापक राजेश त्रिमले, गोपाळ भोसले, अमोल भांगे, पत्रकार अरुण कुरे, दासाहेब कारंडे, सूर्योदय सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत मेदनकर यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. हृदयस्पर्शी आणि उत्साही वातावरणात हा सत्कार समारंभ यशस्वीपणे पार पडला. मेदनकर यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत उपस्थितांनी त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभकामना दिल्या.