आळंदी वार्ता: श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने २५ मे रोजी वेदश्री तपोवन, आळंदी-मोशी रोड, हवालदार वस्ती, डुडूळगांव येथे आयोजित भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, संस्थापक अध्यक्ष, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (न्यास) अयोध्या आणि उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा यांचे शुभाशीर्वाद लाभले. या शिबिरात ६०० ते ७०० नागरिकांनी भेट दिली, १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर २५० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने १०० हून अधिक नागरिकांना मोफत फॅमिली कार्ड देण्यात आले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
शिबिरात मोफत नेत्र तपासणी, रक्तदाब, रँडम ब्लड शुगर, वजन तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होता. स्पर्श ऑर्थो ॲण्ड चाईल्ड केअर क्लिनिकच्या सहकार्याने डॉ. स्वप्नील सोनार (अस्थिरोग तज्ञ, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, एम.बी.बी.एस., डी. ऑर्थो, डीएनबी) यांनी अपघात, फ्रॅक्चर, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, आमवात, कंबरदुखी, हाडांचा ठिसुळपणा यावर मार्गदर्शन केले. डॉ. आकाश दिघे (एम. डी. पेडियाट्रिक्स) यांनी बालरोग, कुपोषण, बाल दमा, कमी वजन, उंची वाढवणे, रात्री लघवी करणे आणि अनेमियावर उपचार केले.
कमलेश हॉस्पिटल, जगताप क्लिनिक, धारा हॉस्पिटल आणि मेडिकव्हर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. अक्षय शिंगणे (B.A.M.S.), डॉ. भुषण जगताप (D.G.M.), डॉ. सुनिल जगताप (B.H.M.S.), आणि डॉ. सुहास गायकवाड (M.B.B.S.) यांनी सेवा दिल्या. मेडिकव्हर हॉस्पिटलचे अमोल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅमिली कार्डद्वारे विशेष लाभ प्रदान करण्यात आले.
या शिबिराला भगवान पोखरकर (शिवसेना जिल्हाप्रमुख, मा. सभापती, खेड), प्रकाश दादा वाडेकर (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), बबनराव कुऱ्हाडे (मा. नगराध्यक्ष), डी. डी. भोसले पाटील (माजी विरोधीपक्ष नेते), योगी निरंजनाथ (प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर संस्थान कमिटी),विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ॲड. रोहिणीताई पवार, निलेश पवार (शिवसेना तालुकाप्रमुख), विलास घुंडरे (मा. उपनगराध्यक्ष), रामशेठ गावडे (विशेष निमंत्रित सदस्य, भाजपा), सचिन गिलबिले (मा. उपनगराध्यक्ष), सागर भोसले (मा. उपनगराध्यक्ष), मिलिंद भाऊ एकबोटे (प्रदेशाध्यक्ष, गोसेवा सेवा संघ), ज्ञानेश्वर रायकर (मा. नगरसेवक), पांडुरंग वहिले (मा. नगरसेवक), नंदकुमार वडगावकर (काँग्रेस नेते, आळंदी शहर), वंदनाताई आल्हाट (सा. कार्यकर्त्या), योगेश तळेकर (टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष), सचिन तळेकर (सा. कार्यकर्ते), गोकुळ काकड (मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष), श्रीकांत चव्हाण (मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष), सागर पाचर्णे (शिवसेना वैद्यकीय पक्ष, मावळ), ज्ञानेश्वर घुंडरे (उपशहर प्रमुख), रोहिदास कदम (शाखा प्रमुख), साईनाथ ताम्हणे (सचिव), शशिकांत बाबर (एच.डी.एफ.सी. बँक मॅनेजर), मनोहर दिवाने (खजिनदार, स्वकुळ ज्ञानेश्वर गृह), श्याम कोळकर (फुलगाव शनी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष), योगेश पगडे (उप तालुका प्रमुख), संजय चौधरी (उपविभाग प्रमुख), शंकरअण्णा घेनंद (तालुका प्रमुख, सहकार सेना), समीर जैद (मा. ग्रामसदस्य), सौरभ गव्हाणे, विशाल पं. तापकीर, मयूर भामरे, आशिष तापकीर, संतोष शेवाळे, विनायक महामुनी, नितीन ननवरे, सचिन शिंदे, नयनाताई झनकर, मनीषा थोरवे, सायरा शेख (राजगुरुनगर शहर प्रमुख), प्रदीप तळेकर, धनंजय मुंगसे, पवन जाधव, श्याम भापकर, हनुमंत चव्हाण, मोरे काका आणि निलेश आढळराव पाटील उपस्थित होते.
वेदश्री तपोवन समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, स्वराज ग्रुप, जय गणेश ग्रुप आणि आळंदी-डुडूळगांव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. सर्व उपस्थितांनी शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.