आळंदी: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा वैशाख शुध्द ६ (३ मे २०२५) ते वैशाख शुध्द १३ (१० मे २०२५) या कालावधीत गट क्र. २२३, ग्रामदैवत भैरवनाथ पटांगण, नवीन सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसमोर, चाकण रोड येथे संपन्न होणार आहे.
या भक्तीमय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाविकांनी २ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त आळंदी ग्रामस्थांनी केले आहे. सर्व भाविकांनी आपले आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
निवास व्यवस्था माहितीसाठी महादेव पंडित कुऱ्हाडे (9270050505), अनिल वाघमारे (9767903367), सागर अशोक रानवडे (9011695827), ज्ञानेश्वर जालिंदर कुऱ्हाडे (9850039380), ज्ञानेश्वर जाधव (9881025633), मंगेश तिताडे (8177977790), ज्ञानेश्वर जोशी (9822073577) आणि श्रीकांत लवांदे (9503040100) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
या सुवर्ण महोत्सवात सहभागी होऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी भक्ती अर्पण करण्याची ही संधी भाविकांनी साधावी, असे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.