Sunday

03-08-2025 Vol 19

श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी पाऊल: 43 विद्यार्थ्यांचा दबदबा

आळंदी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता 5वी आणि 8वी) श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 43 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी अभिमान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

इयत्ता 8वीच्या परीक्षेत आदेश माधव कुडकेकर याने 232 गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर संस्कृती बाजीराव नवले (216), अथर्व जालिंदर गवांदे (204), अनिशा अरविंद शिंदे (198), कल्याण केशव कराळे (194) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय राधिका परमेश्वर फपाळ, सार्थक गणेश गवळी, शुभम केदार, खुशी योगेश पाटील, घाडगे भावार्थ, शिवम सतीश पाल, योगिनी हिवराळे, सौरभ गलांडे, पृथ्वीराज चव्हाण, गायत्री लोहोर, श्रावणी पांचाळ, श्रेयस सचिन कुऱ्हाडे, मानस कुऱ्हाडे, हरीओम पजई, संस्कार भोसकर आणि वेदांत अण्णा चोपडे यांनीही उत्कृष्ट गुण मिळवले.

इयत्ता 5वीच्या परीक्षेत वेदांत राजेश कराळे याने 246 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला, तर आदिती सतीश घाडगे (218), साची देवानंद सुलताने (202), आराध्या रवींद्र भालेराव (196), अर्चना भीमराव कदम (196), ज्ञानेश्वरी जालिंदर गवांदे (192) यांनीही उत्तम कामगिरी केली. रिद्धी गणेश शेलार, भक्ती पांडुरंग शिंदे, पूजा पांडुरंग कुटे, अर्णव प्रफुल्ल फडतरे, ओम गणेश जाधव, आयुष महेंद्र जैन, स्वरांजली राहुल मुंगसे, श्लोक संदीप शेवते, आर्यन देवेंद्र जगदाळे, श्रीरंग राहुल मुंजाळ, विश्वजीत महादेव देवढे, वेदिका भुजंगराव शेवरे, श्रेया शशिकांत बिरादार, भागवत सोपान निकम, संध्या लक्ष्मीकांत मेहरा आणि कल्याणी शिवाजी वीर यांनीही यशाची पताका फडकवली.

या यशात मार्गदर्शक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. इयत्ता 8वीसाठी हेमांगी उपरे आणि 5वीसाठी अनुराधा खेसे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस आणि गुणवत्ता विभाग प्रमुख नारायण पिंगळे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने शाळेच्या नावलौकिकात आणखी भर घातली आहे.

alandivarta