मुक्ताईनगर: श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई समाधी मंदिरातून आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान झाले. ज्येष्ठ शुक्ल नवमीच्या शुभ मुहूर्तावर रात्री ८ ते १० या वेळेत प्रस्थानपूर्व कीर्तन झाले. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘मुक्ताई माता की जय’च्या जयघोषात पालखीने पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू केला. हा सोहळा ३ जुलै २०२५ रोजी पंढरपूर येथे पोहोचेल.
पालखीचा प्रवास आणि मुक्कामाची ठिकाणे –
पालखी सोहळा ५ जून रोजी मुक्ताईनगरातील जुन्या मंदिरापासून सुरू झाला. ६ जून रोजी मुळमंदिर येथे दुपारचा मुक्काम असेल, तर ७ जून रोजी सरखेड येथे दुपारचा विसावा आणि मोताळा येथे रात्रीचा मुक्काम होईल. ८ जून रोजी शेलापूर येथे दुपारचा आणि मलकापूर येथे रात्रीचा मुक्काम असेल. ९ जून रोजी राजूर येथे दुपारचा आणि बुलढाणा येथे रात्रीचा मुक्काम होईल. १० जून रोजी बुलढाणा येथे दुपारचा आणि येळगांव येथे रात्रीचा मुक्काम असेल. ११ जून रोजी हातनी येथे दुपारचा आणि चिखली येथे रात्रीचा मुक्काम होईल. १२ जून रोजी बेराळा फाटा येथे दुपारचा आणि भरोसा फाटा येथे रात्रीचा मुक्काम असेल. १३ जून रोजी अंडेरा फाटा येथे दुपारचा आणि देऊळगाव मही येथे रात्रीचा मुक्काम होईल. १४ जून रोजी गणपती मंदिर, आळंद येथे दुपारचा आणि देऊळगाव राजा येथे रात्रीचा मुक्काम असेल. १५ जून रोजी वाघरुळ येथे दुपारचा आणि कन्हैया नगर, जालना येथे रात्रीचा मुक्काम होईल.
१६ जून रोजी गोरक्षण जालना येथे दुपारचा आणि काजळाफाटा येथे रात्रीचा मुक्काम असेल. १७ जून रोजी शेवगांव पाटी येथे दुपारचा आणि अंबड येथे रात्रीचा मुक्काम होईल. १८ जून रोजी दाडेगांव (शहापूर) येथे दुपारचा आणि वडीगोद्री येथे रात्रीचा मुक्काम असेल. १९ जून रोजी शहागड येथे दुपारचा आणि गेवराई येथे रात्रीचा मुक्काम होईल. २० जून रोजी गढी जयभवानी साखर कारखाना येथे दुपारचा आणि पाडळसिंगी येथे रात्रीचा मुक्काम असेल. २१ जून रोजी हिरापूर येथे दुपारचा आणि नामलगाव फाटा येथे रात्रीचा मुक्काम असेल. २२ जून रोजी बीड माळीवेस हनुमान मंदिर येथे दुपारचा आणि बीड माळीवेस हनुमान मंदिर येथे रात्रीचा मुक्काम होईल. २३ जून रोजी बीड माळीवेस येथे दुपारचा आणि बीड बालाजी मंदिर येथे रात्रीचा मुक्काम असेल. २४ जून रोजी अहिर वडगांव येथे दुपारचा आणि पाली येथे रात्रीचा मुक्काम असेल.
२५ जून रोजी उदंड वडगाव दुपारचा आणि वानगाव फाटा येथे रात्रीचा मुक्काम असेल. २६ जून रोजी चौसाळा येथे दुपारचा आणि पारगाव येथे रात्रीचा मुक्काम होईल. २७ जून रोजी येसवंडी येथे दुपारचा आणि वाकवड येथे रात्रीचा मुक्काम असेल. २८ जून रोजी भूम येथे दुपारचा आणि भूम येथेच रात्रीचा मुक्काम असेल. २९ जून रोजी आष्टा येथे दुपारचा आणि जवळा येथे रात्रीचा मुक्काम होईल. ३० जून रोजी वाकडी येथे दुपारचा आणि शेंद्री येथे रात्रीचा मुक्काम असेल. १ जुलै रोजी वडसिंगे येथे दुपारचा आणि माढा येथे रात्रीचा मुक्काम होईल. २ जुलै रोजी वडाची वाडी येथे दुपारचा आणि आष्टी येथे रात्रीचा मुक्काम होईल. ३ जुलै रोजी रोपडे येथे दुपारचा आणि पंढपूर येथे रात्री पालखी मुक्कामासाठी पोहोचेल.
३ जुलै रोजी पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम असेल. दुपारी ४ वाजता संत नामदेव महाराज आणि संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची भेट होईल. तसेच, श्रीसंत मुक्ताबाई पादुकांचे चंद्रभागा स्नान आणि पंढरपूर प्रवेश मुक्ताई मठ, दत्तघाट येथे होईल. ५ जुलै रोजी आषाढ शुक्ल दशमीला संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याची भेट वाखरी येथे सकाळी ११ वाजता होईल. ६ जुलैला आषाढी एकादशी आहे.
पालखी मार्गावरील प्रत्येक गावात समस्त गावकरी मंडळी आणि स्थानिक संस्थांनी भक्तिमय वातावरणात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांसाठी अन्न, निवास आणि इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. हा पालखी सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, लाखावर वारकऱ्यांचा सहभाग यात आहे.
संपर्क – पालखी सोहळा प्रमुख : रविंद्र महाराज हरणे – 8766743626
रविंद्र पाटील, अध्यक्ष – 8698111171