Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १०१ देशी रोपांचे वृक्षारोपण

आळंदी वार्ता : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आळंदी नगरपरिषदेतर्फे “सिद्धबेट” येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा ६.० अंतर्गत १०१ देशी रोपांचे वृक्षरोपण आणि सार्वजनिक स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. आळंदी नगरपरिषद, महिला बचत गट, आळंदी शहर पत्रकार बांधव, अँफेनॉल सोकॅपॅक्स पुणे आणि मारपु फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी वसुंधरेची हरित शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला आळंदी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हा उपक्रम पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले असून, यामुळे आळंदी शहराच्या हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

alandivarta