आळंदी वार्ता: सिद्धबेट येथे वैकुंठवासी ह.भ.प. जयराम महाराज भोसले आळंदीकर यांच्या समाधीचे दर्शन आणि सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष आणि हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांची आवेकर भावे श्री रामचंद्र संस्थान (ट्रस्ट) विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे यांच्या हस्ते झाला. यावेळी बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी अर्जुन मेदनकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इंद्रायणी आरती समितीचे मार्गदर्शक रोहिदास कदम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.