आळंदी वार्ता: येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने २०२४-२५ च्या एसएससी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांनी ही माहिती देत शाळेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
या यशस्वी निकालामुळे आळंदी परिसरातील पालक आणि नागरिकांनी शाळेच्या दर्जेदार शिक्षणाला पसंती देत शुभेच्छा दिल्या. निकालात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हर्षदा पवार, कौशिकी कडू, शुभम यादव, पूजा चौधरी आणि श्रुती म्हस्के यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ५० टक्के विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले, तर १० टक्के विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी खाजगी ट्युशनशिवाय हे यश संपादन केले.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय गुळवे, प्राचार्या वैष्णवी गुळवे, सर्व संस्था चालक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शिक्षक वर्षा भालेराव, संदीप आवटे, वनिता बैरागी, रुपाली घोगरे, प्रियांका रेवटकर, जगदीश चौधरी, राखी झा आणि जितेंद्र भगत यांनी मोलाचे योगदान दिले.या प्रसंगी पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रा. विजय गुळवे आणि प्राचार्या वैष्णवी गुळवे यांचे अभिनंदन केले. शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.