आळंदी वार्ता: च-होली (बु.) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री वाघेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत ९८.२५ टक्के यश मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या यशानिमित्त स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेचे अभिनंदन करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक एस.पी. नेवासकर, प्रभारी मुख्याध्यापक संपतराव धावडे, पर्यवेक्षक आणि शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रगतीसाठी पंडित तापकीर पाटील यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सेवक वर्ग आणि शिक्षकांचाही प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोळक यांच्या नेतृत्वात झाले. याप्रसंगी पंडित तापकीर पाटील, रघुनाथ भोसले, भाऊसाहेब भोसले, सुनील भोसले, प्रशांत तापकीर पाटील, प्रकाश तापकीर, सुरेश तापकीर, रामदास काळजे आदी उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार’तर्फे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मोळक आणि भाऊसाहेब भोसले यांनी केले, तर प्रशांत तापकीर यांनी आभार मानले. शाळेच्या या यशामुळे च-होली परिसरात आनंदाचे वातावरण आहे.